आपण एखादे सकारात्मक कार्य हाती घेतो तेव्हा अनेक हात आपल्या मागे उभे राहतात. कुठलीही सकारात्मकता कुणापासून लपून राहत नाही. त्याचे नेहमी चांगले च फळ मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे धरती फौंडेशनच्या निमित्ताने आज खूप मित्रमंडळी,नातेवाईक आम्हांला मदत करत आहेत. आणि तसेच ज्या मुलांसाठी आम्ही हे कार्य करत आहोत त्यांना ही या कामाची तितकीच जाणीव आहे,हे वैष्णवी बच्छाव या सहावीत शिकत असलेल्या मुलीने लिहिलेल्या छोट्या पत्रा वरून लक्षात येते.😊😊